जगाच्या नकाशावर अजून एक देश | रोचक माहिती
आज मितीला किती देश आहेत हे सांगण कठीण आहे. खर तर हा विषय संवशोधनचा होण्यास खरच हरकत नाही. आता जगाच्या नकाशावर एक नवा देश अस्तित्वात येऊ पाहात आहे. वॉशिंग्टन, स्पेनमधला अत्यंत सधन म्हणून ओळखला जाणारा कॅटोलिना प्रांतातील नागरिकांनी देशापासून स्वतंत्र होण्याच्या बाजूने कौल दिला. सोमवारी झालेल्या सार्वमतांमध्ये ९० टक्के जनतेने स्वतंत्र कॅटोलिनाच्या बाजूनं मतं दिले आहे. १८८१ पासून कॅटोलिना प्रांताच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे. स्पेनच्या प्रस्थापित राजकारण्यांनी एकमतानं या लढय़ाला विरोध केला आहे. स्पेनच्या विभाजनाला फ्रान्स आणि जर्मनीही विरोध केलाय. या भागाला एक हजार वर्षाहूनही जुना असा स्वतंत्र इतिहास आहे. स्पेनमध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धापूर्वीच या परिसराला स्वातंत्र्य मिळाले होते. १९३९ ते १९७५ या कालावधीत जनरल फ्रान्सिस्को फ्रँको यांच्या नेतृत्वाखाली कॅटोलिनाला मिळालेले स्वातंत्र्य नष्ट करण्यात आले. दरम्यान, फ्रँको यांचे निधन झाले. तेव्हा कॅटोलिनातील राष्ट्रवादाने पुन्हा जन्म घेतला. या राष्ट्रवादाला स्थानिकांकडून दिवसेंदिवस अधिक प्रतिसाद मिळत गेला. अखेर उत्तर पूर्व भागाला पुन्हा स्वातंत्र्य द्यावे लागले. १९७८ मध्ये संविधानाला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला.